"विचार पालवी"
" विचार पालवी"
पाहून काव्य असे
शब्द मनावर ठसे
एका सुंदर विचाराने
केले मनाला वेडेपिसे//१//
शब्दांचा गारवा घेऊन
यमकाचा ठसा देऊन
भरवली शब्दांची जत्रा
विचारांची देऊन मात्रा//२//
शब्द पालवी फुटली
विचारांची गर्दी दाटली
पेरले विचार मनांवर
फुंकर घातली दुःखांवर//३//
सुविचार सागर मनात
मांडला काव्य रुपात
अर्थबोध प्रत्येक शब्दात
वाटला प्रसाद रुपात. //४//
मनाचे विचारमंथन करून
सुविचार मनात साठऊन
करून प्रकट विचार
विचारांचे सदा मुक्तद्वार//५//
कवी: जनार्दन बाळा गोरे
औरंगाबाद.
मोबाईल फोन क्रमांक.
8956663540.
Comments
Post a Comment