"वाचन आणि लेखन"
लेख...."वाचन आणि लेखन"
वाचन आणि लेखन या साहित्य विश्वातील दोन महत्त्वाच्या बाबी आहेत. लिहिण्यासाठी भरपूर वाचन केले गेले पाहिजे. त्यातून एक चांगली साहित्य निर्मिती होत असते. लेखन करीत असताना जे, जे वाचले ते, ते शब्द आपल्या मनाच्या व बुद्धीच्या जोरावर आपल्या लिहिण्यात उतरतात आणि तयार होते साहित्याची एक नवी कलाकृती. शब्द आपोआप आपल्या बुद्धीत येत नाहीत त्यासाठी वाचन करणे हे सूत्र आपण ध्यानात ठेवले पाहिजे. प्रत्येक माणसाच्या आवडी निवडी असतात त्यामधील वाचन आणि लेखन ही आवड महत्त्वाची भूमिका बजावत असते. मनात चांगल्या विचारांची सांगड घालून चांगलं लिहिणं हे एका चांगल्या साहित्य निर्मिती करण्याची गरज आजच्या काळात आहे. नेहमी विचार केला पाहिजे की आपल्याकडून सर्व चांगलेच घडले पाहिजे आणि लेखन कौशल्यात निपुण झाले पाहिजे. वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. मोबाईल फोन हाती आले त्यामध्ये तेवढ्याच प्रमाणात वापर केला पाहिजे. जास्तीत जास्त वेळ वाचनात गेला पाहिजे. वाचानविना चांगली साहित्य निर्मिती होणे अवघड आहे. त्यासाठी वाचन संस्कृती वाढविणे गरजेचे आहे......
गोरे जे. बी.8956663540
Comments
Post a Comment