"पुस्तका"
"पुस्तका"
जन्म पुस्तकाचा, कोठून झाला?
उत्तर त्याचे, आहे ठाऊक कुणाला?
निर्मितीचा धनी, लिहिणारा आहे
लेखक पुस्तकाची, जननी आहे//१//
चांगल्यासाठी जन्म पुस्तकाचा जाना
पुस्तक माणसाचा, मार्गदर्शक माना
एक, एक शब्द, अर्थ त्यांचे अनेक
ग्रंथ लिहिले गेले झाले थोर नेक//२//
पुस्तकाची महती, जाणतो प्रत्येक
वाचावे पुस्तक, लिहावे लेख
बुद्धीची, शुद्धी, वाचल्याने होते
विचारांना दिशा, गती मिळते//३//
पुस्तक आवर्जून वाचावे रोज
चालूच ठेवावी ज्ञानाची खोज
वाचावे एकचित्त होऊन मनी
घडतील रत्न अनमोल, गुणी//४//
कवी: गोरे जनार्दन बाळा
9421984250.
छान
ReplyDeleteधन्यवाद सर आपल्या प्रतिसादाबद्दल
ReplyDeleteधन्यवाद आपल्या प्रतिसादाबद्दल
ReplyDelete