"माणूस"

 "माणूस"

दुःखी कष्टी,मनी होऊन

बसतो डोक्याला हात लावून

साऱ्या गोष्टींचा, होतो संताप

केलेल्या चुकांचा, होतो ताप//१//

कळत नकळत घडलेल्या चुका

आठवताना बसतो काळजाला चटका

आपले कोणी वाटत नाही

करावे काय? सुचत नाही//२//

वेळ झपाट्याने निघून जाते

आयुष्य खूप थोडे उरते

असतं डोक्यात विचारांचं जाळ

घुमत असतं फार काळ. //३//

वाटते बदल घडावा जीवनात

हवे ते सारे मिळावे क्षणात 

आयुष्य सरकते, पुढे पुढे

माणूस मागतो, जीवन देवाकडे//४//

मनासारखे सारेच घडत नाही

मनाचे पाखरू, उडत नाही

आयुष्य आरामात, जगतात काही

काहींना सूख, कधीच सापडत नाही//५//

कवी: जनार्दन बाळा गोरे.

औरंगाबाद.

@जनार्दन

Comments

Popular posts from this blog

"पासिंग नंबर"

"मौन निमंत्रण"