रक्षाबंधन

 "रक्षाबंधन"

सण बहिण भावाचा पावन

येतो घेऊन महिना श्रावण

नात्यात जपून सदा आपलेपण

आनंदात साजरा करूया सण//१//


वर्षाकाठी येतो, सण भाग्याचा

आनंद द्विगुणित होतो मनाचा

बांधून राखी, बहिण भावाला

आशिर्वाद देते, आयुष्य वाढीला//२//

राखी पौर्णिमा, साजरी करुन

स्मृती जागृत ठेऊ आपण

धागे नसतात, साधे काही

त्यात असते, माया, करुणाही//३/

दिनांक २२/०८/२०२१.

कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद.

🙏🏻🙏🏻🙏🏻

Comments

Popular posts from this blog

"पासिंग नंबर"

"मौन निमंत्रण"