स्वप्ने व्हावी फुले
"स्वप्ने व्हावी फुले"
मन आशेच्या गर्तेत आहे
मन वाऱ्याच्या, वेगात वाहे
मनास आहे आसमंत खुले
मनाची स्वप्ने व्हावी फुले//१//
आस एक, लागली खास
पूर्तता स्वप्नांची एक अट्टाहास
जोवर श्वास आहे हृदयात
स्वप्नांची आरास आहे आपल्यात//२//
छोटे असोत, किंवा मोठे
झिजवावे सदा स्वप्नांचे उंबरठे
नित्य स्वप्नांचे, प्रवेशद्वार खुले
पाहिलेली स्वप्ने व्हावी फुले //३//
आशेचे मन, स्वप्नांत रंगते
दिशा मिळते, जीवन फुलते
स्वप्नरंगाने मन चिंब न्हाले
आता स्वप्नांची, होईल फुले//४//
दिनांक:28/08/2021
कवी: जनार्दन बाळा गोरे
औरंगाबाद.
@जनार्दन
Comments
Post a Comment