आशा"

जगताना माणूस आयुष्य

आशेवरच जगत असतो

कधी सोनेरी स्वप्ने मनाशी

कधी काटेरी दुःखे सोसतो//१//

भविष्याची चिंता सतावते

जगताना जीवन माणसाला

क्षण आनंदाचे पाहण्यासाठी

झोकून देतो संकटात स्वतःला//२//

जीवन एक आशा असते

उद्याचे भवितव्य पाहण्यासाठी

सोसून अपयशाचे भयाण निखारे

करतो धडपड माणूस जगण्यासाठी//३//

दूर आसतात सुखाच्या वाटा

 आशेच्या दिशेनं धावणाऱ्या लाटा

काय लिहिलं आहे भाळी?

निनादेल कधी आनंदाची भूपाळी//४//

दिनांक:21/05/2021

कवी:जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद.

8956663540

@जनार्दन

Comments

Popular posts from this blog

"पासिंग नंबर"

"मौन निमंत्रण"