शिक्षण आणि संशोधन....... जनार्दन बाळा गोरे..०५/०३/२०२० शिक्षण आणि संशोधन या विषयावर लिहायचं असे मनात आले आणि मी लिहू लागलो प्रथम शिक्षणाची व्याख्या तयार केली. ती म्हणजे, ज्ञान संपादन करणे म्हणजे शिक्षण होय. शिक्षणाचे महत्त्व अन्यसाधारण असे आहे ते कधीच कमी होणार नाही. यापूर्वी अनेक दिग्गजांनी शिक्षणाच्या व्याख्या त्यांच्या त्यांच्या परीने तयार केल्या. प्रत्येक माणसाकडे शिकण्या योग्य असे काही ना काही असते. ते ज्याने त्याने आपापल्या परीने आत्मसात करण्याचा विचार जरूर करावा. शिकण्यासाठी जन्म आपुला, या उक्तीप्रमणे माणसाने शिकत राहिले पाहिजे. लहान मोठा असा भेद न करता जे, जे शिकता येईल ते, ते शिकत राहिले पाहिजे. जेवढे ज्ञान घेता येईल तेवढे आपल्या पदरात पाडून घेतले पाहिजे. माणसानं गुरु होण्यापेक्षा प्रथम शिष्यत्व पत्करले पाहिजे. जेणेकरून ज्ञानच भांडार आपल्या बुद्धीच्या पर्वतात साठवता येईल, व ते ज्ञान प्रसाद रूपाने इतरांना वाटत असता आपल्या जीवनात मोठा असा वाटा आपल्याला उचलता येईल. ज्ञानाचे आदान प्रदान केल्याने एक भरगच्च ज्ञानी पिढी निर्माण होईल. व पुढे देखील अशा ज्ञान संपादित पिढ्या तयार होतील. ज्ञानाचे भांडार खुले आहे. जेवढे ओढता येईल तेवढे ओढावे आणि इतरांना वाटावे. साऱ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी प्रश्न निर्माण केले गेले पाहिजे. त्यांची उत्तरे शोधण्यासाठी चर्चासत्रे आयोजित करून शैक्षणिकदृष्ट्या राबवली गेली पाहिजे. मग सारेच प्रश्न मार्गी लागतील आणि एक ज्ञानी पिढी उदयास येऊन चांगले म्हणजे ज्ञानी राष्ट्र उदयास येईल. ज्ञानाचा आत्मसाक्षात्कार सर्वास घडेल..... गोरे जनार्दन बाळा व्हॉट्स ऍप क्र.८९५६६६३५४०/९४२१९८४२५०

Comments

Popular posts from this blog

"पासिंग नंबर"

"मौन निमंत्रण"