" श्री स्वामी समर्थ " श्री स्वामी समर्थ माऊली तूच आधार क्रुपेची सावली दया क्षमा शांती तुजपाशी भक्त होतो लीन चरणासी//१// वाट बिकट ही जीवनाची आस लागली तुझ्या कृपेची साथ तुमची आता पाहिजे करावे दूर संकटांचे ओझे //२// अनाथांचे नाथ तुम्ही स्वामी तुम्ही मायबाप तुम्ही अंतर्यामी जगात नांदावी, सदैव शांती आरोग्य संपन्न घडावी उत्क्रांती//३// मना मनाला स्वामिंचाच ध्यास कणा, कणात स्वामींचा वास स्वामी समर्थांची, विस्तीर्ण नजर स्वामी नामाचा करूया गजर //४// दिनांक:२३/०७/२०२१ कवी: जनार्दन बाळा गोरे. औरंगाबाद. @जनार्दन

Comments

Popular posts from this blog

"पासिंग नंबर"

"मौन निमंत्रण"