"क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले"
"क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले" नाव सावित्रीबाई जोतीराव फुले शिकविल्या मुली शिकविली मुले शिक्षणाचे द्वार मुलींसाठी केले खुले ज्ञान दानाचे पवित्र कार्य केले//१// ज्ञानज्योती पेटविल्या मना मनात तेवत आहे आजही ज्ञानाची वात वाट बिकट होती शिकण्याची सुरुवात केली त्यांनी ज्ञानदानाची//२// घडविली शैक्षणिक क्रांती त्यांनी अशा सावित्रीबाई फुले बहुगुणी सोसल्या, त्यांनी यातना अनेक होते साठलेले मनात विचार नेक //३// कवी: जनार्दन बाळा गोरे छत्रपती संभाजी नगर. @जनार्दन ©® दिनांक:०३/०१/२०२४