"एक अनमोल ठेवा"
विषय:"एक अनमोल ठेवा" नित्य नियमाने, सर्वांनी जपावा माणुसकीचा,"एक अनमोल ठेवा" आयुष्य भर अमृतासमान प्यावा ज्याने समाज सारा एक व्हावा.. नित्य नियमाने, सर्वांनी जपावा..!!१!! पूर्वज आपले, सोडून गेले बरेच काही, शिकवून गेले देवून, एक अनमोल ठेवा... जपावा मनात, समजून मेवा.. ज्याने समाज सारा एक व्हावा.. !!२!! अनेक आहेत, संकटं जरी घाबरून न जाता क्षणभरी निश्चय पक्का, मनाचा करावा... मार्ग आता, समतेचा धरावा... ज्याने समाज सारा एक व्हावा.. असा जपावा, माणुसकीचा ठेवा..!!३!! दिनांक १०/११/२०२२ कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद. @जनार्दन