Posts

Showing posts from October, 2022

"दिवाळी आणि फटाके"

 "फटाके आणि दिवाळी" फटाके वाजवून दिवाळी साजरी करण्यात उपयोग नाही. फटाके फोडून दिवाळी साजरी करणे ही पद्धतच मुळात चुकीची आहे. त्याला कारणही तसेच आहे. फटाके फोडण्याच्या नादात आपण एवढे मग्न होतो की, आपले ईतर ठिकाणी लक्ष विचलित होते. रस्त्यावरून वाहने आणि मुकी बिचारी जनावरे जात असताना. आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. फटाक्यांचे आवाज हे कर्णकर्कश असतात. त्यानं कानावर परीणाम होऊ शकतो. तसेच फटाक्यांच्या धुरानं प्रदूषण वाढते. दिवे लावून दिवाळी साजरी करणे ही काळाची गरज आहे. खरी दिवाळी दिव्यांची आहे. फटाक्यांची नाही. तेंव्हा सर्वांनी दिव्यांच्या दिवाळीचे स्वागत करावे. व दरवर्षी फक्त दिवे लावून दिवाळी साजरी करावी. असे केल्याने अनेक गोष्टींना आळा बसेल. वातावरण दूषित होणार नाही. सर्व प्राणीमात्र भितीमुक्त जीवन जगतील. दिवाळीच्या फटाक्यांच्या खर्चात वाढ न करता तो पैसा खाण्यापिण्यात किंवा एखाद्या गरजवंताला मदत करून उपयोगात आणता आला तर आपल्या जीवनाचं सार्थक होईल असे मला वाटते. विशेषतः लहान मुल फटाके फोडताना इतके हरवून जातात की, आपल्याला ईजा होईल याचे भान त्यांना राहत नाही. मोठी माणसे देखील लहा...

"हॉस्टेल जीवन"

 "हॉस्टेल जीवन" (सत्य घटनेवर आधारीत लेखन) मी हॉस्टेल मध्ये शिकत असताना खुप वाईट दिवस काढले आहे.6th मध्ये असताना मला आणि माझ्या लहान भावाला घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्यामुळे हॉस्टेल मध्ये दाखल केले. त्या हॉस्टेल मध्ये एक मोठा हॉल होता साधारणतः तीस ते चाळीस मुलं पाचवी ते बारावी या वर्गात शिकत होते सर्वांनी आपल्या घरून येताना अंथरूण पांघरूण ताट वाटी ग्लास, अंघोळीचा साबण, कपडे इत्यादी साहित्य एका पेटीत भरून आणले होते. सर्वांच्या पेट्या एका लाईनित ठेवण्यास सांगून वसतिगृह व्यवस्थापक सर्व देखरेख ठेवीत असे. दोन वेळ जेवण मिळत होतं. तसेच मंगळवारी विशेष भोजन म्हणजे वरणभात पोळी आणि मस्तपैकी ठेचा मिळत असे. हॉस्टेल पासून एक किलोमीटर अंतरावर आमची शाळा होती. रविवारी सुटी असल्यामुळे मी पार्ट टाईम चहाच्या हॉटेलात काम करत असे. स्वतःचे कपडे स्वतः धोवून काढावे लागत असे. लहानपणापासून कष्ट माझ्या पाचवीलाच पुजलेले आहे ते अजूनपर्यंत टिकून आहे. वडील आजारी होते आई शेतात मोल मजूरी करुन कसेबसे घर चालवी. पोटाची खळगी भरण्यासाठी आणि शिक्षण घेण्यासाठी होस्टेलमध्ये यावं लागलं. एक वर्ष होस्टेलमध्ये काढ...

"दो शब्द"

 "दो शब्द" मिठी वाणी ऐसी बोलो एक एक शब्द को तोलो  शब्दो से ना हो परेशान कोई  ऐसी बनाओ एक रसोई !!१!! तोल मोल के बोलो,  सब शब्द हैं अनमोल शब्दो से खुल जाएगी पोल तोल मोल के बोल.. शब्द.. तोल मोल के बोल !!२!! मिटता हैं घाव एक दिन मिठी वाणी से सबकुछ मुमकिन बोल के सभी कडवी बाते कभी ना गुजरेगी शांती से राते !!३!!  मुफ्त में बोलता हुं एक बात सोच समजकर बोलो हर बात आज अभी से करो शुरुवात सुख शांती की होगी बरसात !!४!! दिनांक १२/१०/२०२२ कवी जनार्दन बाळा गोरे छत्रपती संभाजी महाराज नगर🙏🙏

"ह्या नवरात्री ला करतों नवस"

 "ह्या नवरात्री ला करतों नवस" ह्या नवरात्री ला करतों नवस येऊ दे देवी सर्वत्र सुखाचे दिवस नऊ दिवसांचा धरीन उपवास येऊ दे देवी सर्वत्र सुखाचे दिवस.!!१!! अष्टभुजा महिषासुरमर्दिनी माता सुख समृद्धीचे दे वरदान आता रक्षिण्या भक्ता, घे जन्म पुन्हा दाखव अस्तित्व, कर समृद्ध मना तुझ्या असण्याचा होतो भास... येऊ दे देवी सर्वत्र सुखाचे दिवस !!२!! क्षणो क्षणी ध्यान तुझेच मनी तुच जगदंबा, जगत जननी अनंत रुपे,तुझीच साऱ्या विश्वात बसलीस तू सृष्टीच्या कणा कणात तुच देतेस प्राण आणि श्वास... येऊ दे देवी सर्वत्र सुखाचे दिवस !!३!! दिनांक:०२/१०/२०२२ कवी/लेखक/विचारवंत जनार्दन बाळा गोरे संभाजी नगर.🙏🙏🙏