"राजकारण"
"राजकारण" आता राजकारण सोडा साऱ्यांनी विठ्ठलाशी नाते जोडा राजकारणी, एकाच माळेचे मणी एकाच विषयावर, धुतात धुणी//१// राजकारण दिशाहीन झाले आम जनतेचे मात्र, नुकसान झाले असो कोणताही, पक्ष संघटना "राजकारण"नाही मतलबा विना //२// सोसणारे सोसतात, पोसणारे पोसतात पाहून मजा हसणारे, रिकामे हसतात जननेता फक्त नावाला असतो गरीब कार्यकर्ता, मात्र प्रचाराला फसतो//३// आपण आपले, रहावे नीट विठ्ठला भेटावे, करून पायपीट होतो शपथ विधी वेळी अवेळी विचित्र वाटते राजकारणाची खेळी//४// मनधरणी केली जाते कुणाची माहिती हवी असते क्षणा क्षणाची खुर्चीची लालसा, सुटत नाही कधी बरी होत नाही राजकारणाची व्याधी //५// कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद. @जनार्दन. आपलाच कवी मित्र जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद.