"ब्रेक"
"ब्रेक" गाडीच्या वेगाला,धावत्या मार्गाला थकलेल्या हातांना, शिणलेल्या मनाला परिश्रमाने,थकलेल्या प्रत्येक जणाला ब्रेक हा हवाच असतो जगण्याला //१// ब्रेकचे फायदे असतात अनेक ब्रेंकणे वाचतात जीव हर एक जेंव्हा होतो,अनिष्ट प्रथांचा उद्रेक कुठेतरी,कधीतरी बसतो त्यांना ब्रेक//२// जीवनाला मिळतो, सेवेतून ब्रेक ब्रेकचे असतात,प्रकार अनेक सर्वात उत्तम आहे मनाचा ब्रेक मनाच्या ब्रेकचे फायदे असतात अनेक//३// वेगाची थांबवन्या अफाट शक्ती मिळवण्या व्यसनावर कायमची मुक्ती "ब्रेक"हाच एक उपाय मोठा ब्रेक दाबा, होणार नाही तोटा//४// दिनांक 21/11/2021 कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद. @जनार्दन ©®