Skip to main content
पाहून काव्य असे शब्द मनावर ठसे एका सुंदर विचाराने केले मनाला वेडेपिसे//१// शब्दांचा गारवा घेऊन यमकाचा ठसा देऊन भरवली शब्दांची जत्रा विचारांची देऊन मात्रा//२// शब्द पालवी फुटली विचारांची गर्दी दाटली पेरले विचार मनांवर फुंकर घातली दुःखांवर//३// सुविचार सागर मनात मांडला काव्य रुपात अर्थबोध प्रत्येक शब्दात वाटला प्रसाद रुपात. //४// मनाचे विचारमंथन करून सुविचार मनात साठऊन करून प्रकट विचार विचारांचे सदा मुक्तद्वार//५// कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद.
Comments
Post a Comment