Skip to main content
विषय:"ती एक रात्र" ती एक रात्र होती नित्य आठवणीत राहणारी हिवाळ्याचे दिवस होते थंडी होती बोचनारी //१// घरी जाण्याची होती घाई गाडी एकही लागली नाही उशीर झाला होता फार थंडी सुटली होती गार //२// बस थांबा रिता झाला सुन्न सारा आवार झाला निघून गेली एक, एक गाडी माझा मात्र नाईलाज झाला//३// ती एक रात्र अशी घडली राहिली सदैव स्मरणात वेळेवर बस सुटत नाही आजही गाव खेड्यात //४// शेकोटीचा आधार घेत अवघी रात्र काढली ती एक रात्र माझ्या नित्य आठवणीत राहिली//५// कवी: गोरे जनार्दन बाळा. @जनार्दन दिनांक:२६/०७/२०२०.
Comments
Post a Comment