Skip to main content
विषय: रंगाचे महत्त्व रंगाचे महत्त्व आहे सर्वत्र सप्तरंग सप्तसुरा मध्ये दिसतो बदल ह्या धरेत काळया, हिरव्या रंगामध्ये//१// रंग दिसतोय अनेक ठिकाणी फुला, पानांत आणि मनात निळ्या अंबरात, आणि गोड फळांच्या गाभ्यात//२// गुलाब सुगंधी, स्वच्छंद हसे मयुरावर शोभे, मोरपीसे निळे पाणी, कोकिळा राणी साऱ्यांना असते, रंगाचे महत्त्व//३// कपडे आपले रंगी बेरंगी गाजर लाल, आहे बहुगुणी रंगांनी आहे जगण्याला अर्थ रंगाचे महत्त्व आहे सर्वत्र//४// दिनांक १९/१०/२०२०. कवी: जनार्दन बाळा गोरे. औरंगाबाद.
Comments
Post a Comment