" यश क्रांती"
"यश क्रांती" मनाचा एकटेपणा जावा म्हणून करावे सतत काहीतरी काम सतत कार्यरत राहून गाळावा कष्टाने घाम !!१!! दोन पैसे मिळाले जरी कमी तरी उपाशी राहत नाही कुणी आवर्जून कष्ट करत जावे मिळेल तेंव्हाच जे, जे हवे !!२!! साष्टांग दंडवत, प्रभात वेळी दुपारी आणि सायंकाळी नित्य आठवावे रूप भगवंताचे सुटतील प्रश्न दीन दुःखीतांचे !!३!! होत असले शोषण जरी क्षण, क्षण पाहतो तो श्रीहरी मनोमन प्रार्थना त्याच्या चरणी प्रत्येक दिवस लागो सत्कारणी !!४!! ऐकेल हाक, भागेल भूक मिळेल सूख,आपणास कधीतरी लाभेल शांती, उजळेल कांती नव्या युगाची, घडेल यश क्रांती !!५!! दिनांक:१२/१२/२०२३ कवी/साहित्यिक/ विचारवंत जनार्दन बाळा गोरे छत्रपती संभाजी नगर @जनार्दन