Posts

Showing posts from May, 2023

"सोनेरी पहाट"

"सोनेरी पहाट" डोंगराच्या माथ्यावर सुर्य उगवला सोन्यासारखा सोनेरी, उजेड पडला अरूंद नागमोडी एक पाऊलवाट गावामधून निघते, जाते थेट डोंगरात !!१!! सूर्याच्या भोवती, आभाळ पिवळे सोनेरी पहाटेनं, नेसले सोवळे हिरवाई ने नटली ती पायवाट डोंगराच्या कुशीत, झाडी घनदाट !!२!! गवतामध्ये हिरव्या,घरे उभी कौलारू झाडे झुडुपे डोलती मंद वाहे वारू सप्त रंगात न्हाली, सोनेरी पहाट जगाहून वेगळा पहा निसर्गाचा थाट !!३!! दिनांक:२७/०४/२०२३ कवी/साहित्यिक/ विचारवंत जनार्दन बाळा गोरे छत्रपती संभाजी नगर @जनार्दन