Posts

Showing posts from February, 2023

"शिवरात्री"

 "शिवरात्री" घर,घर दिखेंगे जीवनयात्री क्यो की आज हैं शिवरात्री शिवभक्ती की एक छबी जो दिलायेगी, हमें कामयाबी !!१!! शिव जी की महिमा अपरंपार जो बढाये ग्यांन और व्यापार मन में शिव भक्ती की उमंग लाए अपने जीवन में रंग !!२!! तन मन से भक्ती में रंग जाए जीवन सफल का भाव जगाये शिवरात्री का यह महा त्योहार आए साल में एक बार. !!३!! भोलेनाथ की कृपा बरसेगी मनोकामना हर पूरी होगी भोलेनाथ जी हैं बडे दयालू भक्ती महिमा हमेशा चालू  !!४!! ..... जय भोलेनाथ, जय शंकर जी... दिनांक १८/०२/२०२३ कवि: जनार्दन बाळा गोरे संभाजीनगर @जनार्दन

"वाचा चांगली असावी"

 "वाचा चांगली असावी" आपली वाचा चांगली असावी, म्हणजे बोबडी नसावी असं म्हणणं नाही तर, आपल्याला निसर्गाने बोलायला तोंड दिले आहे. त्या तोंडाद्वारे चांगलेच शब्द उच्चारले गेले पाहिजे. कारण आपले बोल हे ईतरांना लागेल किंवा मनाला खटकेल असे नसावे. वादाला तोंड फु टेल असे कदापी वागू नये. असे लहान मुलांना आपण समजावून सांगत असतो. पण तेच शब्द आता मोठ्या लोकांना पटवून सांगण्याची वेळ आली आहे. त्यासाठी पुन्हा बालसंस्कार मोठ्यांना शिकवावे लागणार आहे. बऱ्याच ठिकाणी लोकं लहान मोठ्यांचा आदर विसरले आहेत. त्यांच्या डोक्यात फक्त आणि फक्त ईगो भरलेला आहे तो म्हणजे मीच श्रेष्ठ. आत्मपरीक्षण करण्याची गरज आता सर्वांना आहे. एक शब्द कमी बोलण म्हणजे मीच का माघार घ्यावी. ही दुर्बुद्धी सतत वाद उभा करणाऱ्या प्रत्येक जनाला होत असते.  व्यर्थ जिव्हा चालवणाऱ्या(उचलली जीभ लावली टाळ्याला असे लोकं) साऱ्यांनी थोडा विचार करावा. वाचा चांगली वापरा समजत नसेल तर कसे बोलावे कसे वागावे याचे शास्त्र शुध्द पद्धतीने थोरा मोठ्यांकडून शिकुन घ्यावे. किंमत करावी श्रमाची व्यर्थ बडबड काय कामाची. आपल्या मनाला हातांना काम लावा मन आणि हात...

"प्रजासत्ताक दिवस"

 नमस्कार मित्रांनो🙏🙏 सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. आज 26 जानेवारी 2022. आपला प्रजासत्ताक दिन आपण या दिवसाला प्रजासत्ताक दिन असे का म्हणतो? त्याचे खरे उत्तर म्हणजे प्रजा म्हणजे जनता आणि सत्ताक म्हणजे सत्ता स्वातंत्र्य जनतेला मिळालेली सत्ता म्हणजे प्रजासत्ताक खऱ्या अर्थानं या दिवशी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाची राज्यघटना अमलात आली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटना उदयास आणली. आपल्या हाती पूर्णपणे सत्ता सोपवून इंग्रज त्यांच्या देशी निघून गेले. त्याआधी त्यांनी आपल्यावर खूपच निर्दयी व्यवहार केला. आपल्याला स्वातंत्र्य मिळावे म्हणुन अनेक देशभक्त स्वतःहून पुढे येऊन देशासाठी लढले काहीं फासावर गेले. त्यांचे विचार एकच होते ध्येय सुद्धा नेकच होतें ते फक्त आणि फक्त देशाला स्वातंत्र्य जुलूम शाही दडपशाही त्यांना सहन झाली नाही. म्हणून देशाच्या देशभक्तांनी मिळून एकच विचार केला तो म्हणजे स्वातंत्र्य. आपल्याला स्वातंत्र्य देऊन स्वतःचे बलिदान दिले. असे महात्मे असे क्रांतिकारक आणि असे देशहितकारक पुन्हा होणे नाही. स्वातंत्र्य ...